ही क्रमश: लेखमाला असणार आहे का? पात्रपरिचय अगदी तपशीलाने केला आहे म्हणून मनात आले.

उषेने .. संयोगितेने ... ही शब्दरूपे वाचायला छान वाटली. ... ही पात्रे पुढे येणार आहेत का?

...एका प्रतीचा मृत्यू झाला तर बाकीच्या सर्व प्रती तत्क्षणी मृत्यू पावतील...

ह्म्म ही गोष्ट अफलातून आहे.

मागे न्यूड बॉम्ब नावाचा एक विनोदी चित्रपट आलेला होता त्यातील खलनायकाकडे अशी प्रतिरूपे करण्याचे यंत्र असते. मूळ कथेत प्रतिरूपाचा भाग अगदी थोडा असला तरी तुमच्या गोष्टीवरून तो आठवल्यावाचून राहिला नाही.