इ. स. २०१६ मध्ये मुंबई - पुणे द्रुतगती मार्गाने पुण्याला जायचा योग आला. मुंबई विमानतळापासून पुण्याला जायचा प्रवास अंधारात होता, तेव्हा काही दिसले नाही. अगदी परदेशातल्यासारखा रस्ता म्हणून चांगले वाटत होते. ह्या रस्त्याच्या निमित्ताने वाहन चालनात शिस्त आलेली असेल असे वाटत होते.

परतीचे वेळी लख्ख सूर्यप्रकासात द्रुतगतीमार्गाचे निरीक्षण झाले! डाव्या खिडकीतून पाहिले तर बाजूच्या मार्गिकेतून "उलट दिशेने" एक फटफटीवाला म्हातारा जाताना दिसला. त्यातही त्या फटफटीवर तिघे बसलेले होते! (कमीत कमी तीन अपराध! टोल चुकवणे, उलट दिशेने वाहन चालवणे आणि तिघे स्वार होणे. शिरस्त्राणे नसण्याचा, अनुज्ञप्ती नसण्याचा वा जवळ न बागळण्याचाही अपराथ झालेला असेल तर कळायला मार्ग नाही.) मला एका निरीक्षणात हे दिसले तर असे कितीतरी ठिकाणी होत असणार.