...काळजी रस्त्यावरच्या पब्लिकची वाटते.
लेखकाने काय वाट्टेल ते प्यावे (बियर, वाईन, रम, व्हिस्की, वोडका, काय हवे ते!); तो लेखकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, नि त्याबद्दल कोणाला काही आक्षेप तर सोडाच, परंतु काही म्हणणे असण्याचेसुद्धा कारण नाही. (फार कशाला, मला व्यक्तिश: हे प्रकार प्यायला आवडतात; खोटे कशाला बोला?) आणि, जोवर त्याचे जे काही चांगले/वाईट/न्यूट्रल (मराठी? 'नपुंसक' येथे बसेलसे वाटत नाही; चूभूद्याघ्या.) परिणाम/न-परिणाम व्हायचे आहेत (किंवा नाहीत), ते लेखकापुरतेच मर्यादित आहेत, तोवर कोणा त्रयस्थाला 'लेखका'बद्दल काळजी वाटण्याचेसुद्धा काहीही कारण निदान मला तरी दृग्गोचर होत नाही.
मात्र, दारू पिऊन/पीतपीत वाहन चालविणे हा सामाजिक बेजबाबदारीचा कळस आहे. (भले ती दारू चढलेली असो वा नसो.) परंतु, चलता है, हिन्दुस्तान है, त्याला काय करणार? चालायचेच.