या प्रकाराचे (स्पॅनिश भाषेतील) नाव 'तॉर्तिय्या' (tortilla) असे आहे, नव्हे काय?

(मेक्सिको, निकाराग्वा, तथा (अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत बोलल्या जाणाऱ्या स्पॅनिश भाषेवर मेक्सिकन स्पॅनिशचा प्रभाव असल्याकारणाने) अमेरिकेची संयुक्त संस्थाने, या तीन देशांत बोलल्या जाणाऱ्या स्पॅनिश भाषेत tortillaचा अर्थ पूर्णपणे वेगळा ('मक्याच्या अथवा गव्हाच्या पिठापासून बनविलेला एक चपातीसदृश खाद्यपदार्थ' असा) होतो; मात्र, जगातील उर्वरित झाडून साऱ्या स्पॅनिशभाषक देशांत tortilla हे नामाभिधान प्रस्तुत पाककृतीत वर्णन केलेल्या खाद्यपदार्थाकरिता वापरले जाते, असे वाचलेले आहे. (चूभूद्याघ्या.))