तॉर्तिय्या शब्दाची माहिती रंजक आणि बोधक वाटते. मी आतापर्यंत तॉर्तिय्या म्हणजे मेक्सिकोत करतात त्या मक्याच्या किंवा गव्हाच्या पिठाच्या चपात्या असेच समजत होतो/आहे. प्रत्यक्षात स्पेनमध्ये अशा ऑम्लेटला तॉर्तिय्या म्हणतात हे नव्याने समजले. (अगदी सुरवातीसुरवातीला मी टॉर्टिला .. असे म्हणत असे, पण एका देशबांधवाने सुधारणा सुचवली!)  मात्र जालावर अशा ऑम्लेटला 'स्पॅनिश तॉर्तिय्या' असे म्हटलेले दिसते. म्हणजे कदाचित तॉर्तिय्या हा शब्द अधिक व्यापक अर्थाने वापरला जात असावा असे वाटते.