किती पुण्याचं स्थलांतर ...

एकसष्ट साली पानशेत धरणाचे बांधकाम सुरू असताना पावसात ते फुटले. त्या पाण्याचा लोंढा खडकवासल्यात आल्यावर खडकवासला धरणही फुटले आणि पुण्यात अकस्मात पूर आला. त्यावेळची कमाल पूररेषा एका इमारतीवर रंगवलेली आहे. (हे सर्व मी ऐकलेले आहे. माझी तपशीलात चूक असू शकेल.).

उद्या जर चारही धरणे भरण्याएवढा पाऊस झालाच तर धरणे अशी 'अकस्मात' भरणार नाहीत आणि विसर्गही अकस्मात चालू होणार नाहीत. ते अकस्मात नसल्याने एकसष्ट सालाइतका मोठा लोट येणार नाही. त्यातही आज तळमजल्यावर निवासी गाळे असण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे असे काही स्थलांतर 'करावे लागणार' नाही. (... असा माझा अंदाज आहे. स्थापत्य अभियंते यावर अधिक प्रकाश टाकू शकतील. ) 

नदीपात्रातच ज्या वस्त्या आहेत त्यांचे स्थलांतर दरवेळी होते (हेही मी ऐकलेले आहे.)