लहानपणी हे गाणे कित्येक वेळा रेडिओवरून ऐकू यायचे. आमच्याकडे तेव्हा रेडिओ नव्हता. शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या रेडिओवरून ऐकू यायचे किंवा लांबवरून ऐकू यायचे. त्याचे शब्द त्यावेळी कधीच समजले नाहीत. ध्रुवपदाचा अंतिम तुकडा का कोण जाणे "अशी कशी तुझ्यावर आली कळा..." असा काहीसा कानात बसला होता. (तो आज हे गाणे येथे वाचेपर्यंत तसाच होता!!). पुढे केव्हातरी 'रात्र काळी घागर काळी" असे शीर्षक असल्याचे कळले. त्या शीर्षकाचा एखादा लेखही कोठेतरी वाचल्याचे आठवते.