असं म्हणतात की ' उजव्या हाताने केलेले दान, डाव्या हाताला सुद्धा कळू द्यायचे नसते.' पण आपल्याकडे मात्र दिलेल्या दानाची प्रसिद्धी किती आणि कशी होईल याकडेच जास्त लक्ष दिले जाते. त्यातून ' सोशल मीडिया ' आहेच ,अशा दानाच्या दवंड्या द्यायला.! ! महत्वाची गोष्ट अशी कि दान देण्यास काहीही हरकत नाही, ते सत्पात्रीच करावे हेही उत्तम, पण अशा दानधर्मामुळे मनात
" अहंकार " निर्माण व्हायला नको. साधी गोष्ट आहे, की ज्याच्याकडे देण्यासारखे आहे, तोच देऊ शकतो. मागे एक विचार वाचावयास मिळाला होता तो असा, " सोसायटीमध्ये एखादी जागा शोधून तेथे फलक लावावा. " तुम्हाला जे नको असेल, ते येथे आणून ठेवा. आणि तुम्हाला जे हवे असेल,ते येथून घेऊन जा ." यामध्ये दान सत्पात्री तर आपोआपच होईल आणि अहंकाराचा वारा पण मनाला लागणार नाही. मी हा प्रयोग करून पाहिला होता. मला (पुस्तक वेडा असल्याने) विश्वास पाटील यांचे " पानिपत " हे पुस्तक मिळाले. नंतर हा प्रयोग आठवड्यातच बंद पडला.