कल्पना चांगली आहे. फक्त एक व्यावहारिक अडचण येऊ शकेल. दृष्य-साक्षरता.
यावेळेस अनेक मतदारसंघांत तीसहून जास्ती उमेदवार होते. महाराष्ट्रातच पाहिले तर अमरावती ३७ (नोटा धरून ३८), औरंगाबाद ३७ (नोटा धरून ३८), बारामती ३८ (नोटा धरून ३९), बीड ४१ (नोटा धरून ४२), हिंगोली ३३ (नोटा धरून ३४), माढा ३२ (नोटा धरून ३३), मावळ ३३ (नोटा धरून ३४), नाशिक ३१ (नोटा धरून ३२), उस्मानाबाद ३१ (नोटा धरून ३२), परभणी ३४ (नोटा धरून ३५), पुणे ३५ (नोटा धरून ३६). इतक्या सगळ्या उमेदवारांना स्पष्टपणे वेगळी दिसतील अशी चिन्हे देणे ही ती अडचण.
कारण महाराष्ट्रात सातारा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवलेल्या उमेदवाराच्या चिन्हाशी साधर्म्य साधणारे चिन्ह एका अपक्षाला मिळाले होते. विजयी उमेदवार ३२,७७१ मतांच्या फरकाने जिंकला. त्या अपक्ष उमेदवाराला ३७,०६२ मते मिळाली.