(१) ज्या नेत्याला,पक्षाला आपण मत देत आहोत, त्याचेकडुन वेळप्रसंगी आपले अडलेले काम मार्गी लागावे किंवा आपल्या भागात काही सुधारणा नेता वा पक्ष घडविल याच हेतुने मतदार मतदान करीत असतो.मात्र असा स्वार्थ ज्यांना साधायचा नसतो, त्यांनी मतदान करुच नये कां? (२) मतदारापुढे यादीमधल्या उमेदवारांशिवाय "यातील कोणीही नाही " नोटा "हा पर्याय आहे, पण नोटा ला सर्वात जास्त मते मिळाली तर ती निवडणुक रद्द होवुन, पुन्हा निवडणुक घेण्याची कायदेशीर तरतुद आहे, पण पुन्हा तेच उमेदवर यादीत येऊ शकतात, मग वायफ़ळ खर्च वाढुन उपयोग होणार नसेल तर त्यापेक्षा आहे त्याच यादीतील "त्यातल्या त्यात " बऱ्या उमेदवाराला मत देण्याचे ठरवून, मत देण्यास काय हरकत आहे ? यात मतदाराचे काहीही चुकत नाही. ' दगडापेक्षा वीट बरी " असा विचार सामान्य मतदार करित असतो. (३) पूर्वी सुद्धा " तुमच्या गावासाठी अमुक रस्ता बांधुन देवू, तमुक धरण बांधण्यासाठी प्रयत्न करु " अशा प्रकारची आश्वासने म्हणजेच " रेवडी " वाटली जायचीच ना ? आता त्याच रेवड्या उघडपणे , सर्वच पक्ष वाटतात, मग असा पायंडा पडत गेल्यास ,मतदाराचा दोष तो काय ? असं आणखी बरंच काही लिहिता येईल. तुर्तास पुरे !!