हे लिहिण्यामागचा उद्देश लक्षात येण्यासारखा आहे; मात्र मतदानात विवेक तारतम्य चिकित्सा ह्यांचा वापर नव्हताच असे सिद्ध कसे करणार?
उदा महाराष्ट्रात एका लोकसभा पोटनिवडणुकीत एका पक्षाचा उमेदवार निवडून आला; पण त्यातल्या सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये विरुद्ध मंडळींची निवड झाली. आता येथे तेच मतदार एकीकडे एका यंत्रावर एक निवडतात आणि दुसऱ्या यंत्रावर दुसरे निवडतात.... ह्याचे विश्लेषण कसे करणार? लोकसभेच्या बाबतीत सहानुभूतीची मते मिळाली असे म्हटले जाते. ते समजा खरे असेल तरी सहानुभूतीने निवड करायची की नाही हे त्या त्या मतदाराने त्याच्या त्याच्या विवेकानुसारच केले असणार ना? ... तेव्हा 'वावडे' नसावे असे वाटते.