विवेक, तारतम्यआणि चिकित्सक विचार यांचे समाजला वावडे आहे की काय अशी शंका यावी असे राजकीय चित्र सध्या दिसते आहे.
समाजाचे जे असेल ते असेल. पण धागाकर्त्याला या गोष्टींचे वावडे आहे का अशी शंका यायला लागली आहे. कारण धागा काढल्यानंतर माझ्यासह इतरांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांबद्दल ते मत देण्याचे टाळतात. वेळ नसेल असे म्हणावे तर "चिकन रोस्ट" ची पाककृती लिहिण्यास मात्र त्यांच्याजवळ वेळ आहे.
असो. वाचक सूज्ञ आहेत.
जाता जाता - ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी ईव्हीएम या विषयावर आत्मक्लेष आंदोलन सुरू केले आहे. ईव्हीएम हॅक करून दाखवा असे निवडणूक आयोगाने आव्हान दिल्यावर ते स्वीकारायचे नाही आणि मनासारखे निकाल लागले नाहीत तर ईव्हीएम विरुद्ध आत्मक्लेष आंदोलन सुरू करायचे हा दुटप्पीपणा आहे.
विनायक