ज्यात देह जन्म घेतो, विहरतो आणि विलीन होतो; ती कायम स्थिती आपण आहोत हा उलगडा होतो.

आत्मा हा शब्द निरर्थक आणि प्रचिती शून्य आहे . ती केवळ कल्पना वाटते पण ज्यात देह वावरतोय ती स्थिती प्रकट आणि सर्वत्र आहे .


शिवाय एकाही सिद्धानी तुमचा जन्म झालेला नाही म्हणून तुम्ही आत्मा आहात हे सांगितलेलं नाही. तर आत्मा ही काही तरी प्राप्त करायची स्थिती आहे असं सांगितलय



 ज्यात देह वावरतोय ते आपण आहोत या फक्त सहा शब्दात जगातलं सर्व अध्यात्म सामावलं आहे