चौकस,
संघशासन ही पातळी सर्वांत वरची हे महत्त्वाचं. काहींना हा उल्लेख द्व्यर्थी वाटतो. मी 'श्लेष' अलंकार वाटतो असं लिहिणार होतो, पण तसं क्लेषदायक अग्र-लिखाण लोकसत्तात लिहिलं जातं (असं अद्वैतची आई किंवा बाबा म्हणत असावेत).
दुसऱ्या धड्यातलं "धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वामुळे भारतीय समाजात धार्मिक सामंजस्य टिकून राहिले आहे" हे वाक्य अद्वैतनं ऑप्शनला टाकलेलं दिसतंय. धड्याखालील प्रश्नांमध्ये त्याला १ किंवा १/२ गुणांचंच महत्त्व आहे. शिवाय हे न शिकल्यामुळे तो समाज आणि राज-कारणात गुणी म्हणून नाव काढण्याची शक्यता अधिक.
लेखमाला अप्रतिम. वाक्या-वाक्याला हसलो. अद्वैत लवकरच सातवीत जाईल आणि तिथेही अशाच पद्धतीनं अभ्यास-पुस्तिका तयार करेल अशी अपेक्षा.
- कुमार
ता. क. अनघा आणि अनिकेतच्या मोबाईल्सना रेंज मिळू लागली की काय?