आठ 'स'गणांचे वृत्त (अद्याप) मिळाले नाही; पण चार 'स'गणांचे 'तोटक' वृत्त सापडले!

तेव्हा संपूर्ण वृत्त सापडले नाही तर (किंवा तोवर) ह्याला 'दुतोटक' असे काही म्हणता येईल असे वाटते.

कविवर्य माधव जूलियनांच्या छन्दोविचार ह्या सुप्रसिद्ध ग्रंथात खालील माहिती मिळाली:

उदाहरण १:
पडतां कधि गाठ न शब्द वदे,
मग धाडुनि भेट कशास्तव दे ?
सखि, शान्त विरक्त दिसो मुनि तो,
बसतो टक लावुनि चोरुनि तो.
-माधव जूलियन
(माधवरावांनी वृत्ताचे नाव उदाहरणात मोठ्या कौशल्याने गुंफलेले दिसते!)

उदाहरण २:
"यदि जन्मजरामरणं न भवेत्
यदि चेष्टवियोगभयं न भवेत्
यदि सर्वमनित्यमिदं न भवेत्
अिहजन्मनि कस्य रतिर्नभवेत्"
-सुभाषित

टीपा:
हे वृत्त फार प्राचीन आहे. महाभाष्य खण्ड १ (पृ. ३३४) मधील 'दुहि याचि रुधि' ही कारिका तोटकवृत्तांत आहे.

मराठींत मोरोपन्तकृत हररमणीय रामायण हे तोटकवृत्तांत आहे.

छन्दोरचनेतील मूळ स्रोत