ज्ञानेश्वरी (भावार्थ दीपिका) लिहिणारे ज्ञानेश्वर वेगळे आणि अभंग लिहिणारे ज्ञानेश्वर वेगळे असे काही संशोधन पूर्वी प्रसिद्ध झाले होते. ज्ञानेश्वरीच्या आणि अभंगांच्या भाषेतला फरक पाहून ते पटण्यासारखे वाटले होते. ज्ञानेश्वरीची मराठी नाथपंथीय मराठी सारखी वाटते. अभंगांची मराठी अधिक सुबोध आहे. मराठीचा अरबीशी राजकीय संबंध बहुदा खिलजीच्या आक्रमणानंतर आला असावा. नाथपंथीय मराठीत अरबीचा वापर/वावर असण्याची संभाव्यता कमी वाटते. (मी भाषातज्ज्ञ, अध्यात्मतज्ज्ञ इ. काही नाही. हे लेखन हा माझा केवळ कल्पनाविलास आहे.)

मनोगतावर पूर्वी प्रकाशित झालेला एक लेख