मोरया हा शब्द "म्होरं या' चा अपभ्रंश तर नसेल? गणपतीच्या मिरवणुकीत आपण म्हणतो गणपतीबाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. हे दोन्ही "या ",क्रियापद म्हणून वापरले असावेत. किंवा "म्होरक्या"म्हणजे नेता, पुढारी, अग्रणी असा जो अर्थ आहे तो तर अभिप्रेत नसेल? कारण हा गणपती गणांचा अधिपती म्हणून मानला जातो.हा माझा अंदाज आहे.तो चुकीचा असू शकतो. काही इतर अर्थ असल्यास माहितगारांनी सांगावा. मलाही ह्या शब्दाबद्दल उत्सुकता आहे.