पारेषणा बाबत - इक्ष (पाहणे) पासून तयार झालेले इतर शब्द( परीक्षण, निरीक्षण) पाहता पारेषणाचे मूळ पाहण्यात नसावे. शिवाय हा शब्द ट्रान्स्मिशन ला पर्याय आहे. तेंव्हा पलीकडे देणे असे काही तरी असावे. इतरांनाही ही माहिती कळावी व त्यांचीही मते कळावीत म्हणून हेच उत्तर प्रतिसादातही देत आहे....तो
----------------
आघूर्ण= घूर्ण शब्दाचा मला माहित असलेला अर्थ-गरगर फिरणारे,गरगर फिरणे ,वावटळ असा आहे. आ हा उपसर्ग लागला आहे. त्यामुळे अर्थात फार बदल होईल असे वाटत नाही. गतीशी निगडित शब्द आहे.
पारेषण= पार+ईषण पलीकडील बघणे असा असावा.
प्रणोद= प्रेरणा, मार्गदर्शन . ह्यातील प्रेरणा हा अर्थ विज्ञानात असावा....आशा कऱ्हाडे