वरदा,
आपण तर बुवा नतमस्तक झालो आहोत. मीराताई ( गणित ), राधा ( कटपयादी सूत्रे ), मृदुला ( डॉर्विन चा सिद्धांत ) या सगळ्यांसमोर अगदी नतमस्तक. तूम्ही सर्व नौकरी, शिक्षण, घरकाम आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळून हे कसे पार पाडता हे एक नवलच म्हणावे लागेल.
प्रशासक महाशय,
या सर्व भगिनी मंडळाला थोडी शिस्त लावा आणि प्रत्येकाकडून आठवड्यात एक किंवा पंधरवाड्यात असे लेख मिळेल अशी काही सोय करता येईल का ते पहा बुवा. बाकी इतकी प्रतिभा आहे त्याला काही शिस्त आली तर फार मोठे कार्य पार पडत आहे असे काळांतराने दिसावे हीच इच्छा.
असेच लेख वाचण्यासाठी मिळावे हीच प्रार्थना.
द्वारकानाथ