वरदा,
आपला लेख रोचक आहे. आपल्या अभ्यासकतेला अभिवादन.
आपले पूर्वज मूर्ख होते असा बरेचदा आधुनिक युरोपीयांचा दृष्टिकोन आढळतो. याउलट भारतीय लोक नेहमीच आपल्या पूर्वजांच्या अभ्यासाचा व ज्ञानाचा आदर करत आले आहेत. चू भू द्या घ्या.
उपनिषदांचा काळ आपण सांगितला त्याहून जुना असू शकतो असे वाटते. चू भू द्या घ्या.
प्राचीन काळातील पंडितांनी मिळवलेल्या ज्ञानाचा अभ्यास करून आणि त्यात भर घालून मानवी पिढ्या आपले निसर्गाबद्दलचे कुतूहल अधिक ज्ञान मिळवून शमविण्याच्या प्रयत्नात आहेत.
हे वाक्य पटले आणि खूप आवडले.
आगामी लेखांमध्ये येणारी विधाने ही अंतिम सत्य नसून अमुक अमुक लोकांची मते आहेत असा वैधानिक इशारा वेळोवेळी देणे आवश्यक आहे असे वाटते. चू भू द्या घ्या.
आपला
(सहमत) प्रवासी