आपल्याकडे पोळा म्हणून एक सण असतो. तेंव्हा बैलांची पूजा करतात. याच दिवशी पूजा करायच्या आधी बैलांना रंगवतात आणि सजवतात.

रंगवण्याचा सर्वात सोपा प्रकार म्हणजे रंगात हात बुडवून (आपण रंगपंचमी च्या दिवशी एकमेकांच्या पाठीवर मारतो तसे) पंज्यांचे छाप मारणे.

सजवताना गळ्यात घुंगरू, (पायात तोडे ...?), पाठीवर झूल, शिंगांना गोंडे आणि बाशिंग असा थाट असतो.

बाशिंग म्हणजे रंगीबेरंगी कापड, कागद आणि/अथवा फुलांचे दोन शिंगांच्या मध्ये बांधलेले छोटे तोरण.