अदितीजी,
स. न. वि. वि.
माझे शुध्दलेखनाचे आणि व्याकरणाचे ज्ञान तसे तोकडेच.त्यामुळे आपली टिप्पणी वाचल्यानंतर मी मोर्चा कै.मो.रा.वाळिंबे यांच्या 'सुगम मराठी व्याकरण- लेखन' या पुस्तकाकडे वळवला.
I quote, " तत्सम शब्दाचे उपान्त्य अक्षर ( दीर्घ ) ई किंवा ऊ- युक्त असेल तर त्याचे सामान्यरूप करताना ते दीर्घच लिहावे: गीता-गीतेचा-गीतेप्रमाणे, पूर्व-पूर्वेला-पूर्वेकडे, परीक्षा-परीक्षेत-परीक्षेसाठी."
तत्सम =जे शब्द संस्कृत भाषेतले असून जे जसेच्या तसे मराठी भाषेत आले आहेत ते.
मोल्सवर्थ शब्दकोशातून प्रतीक्षा हा शब्द तत्सम स्त्रीलिंगी असल्याचीही खात्री करून घेतली.
या सार्याचा निष्कर्ष मी असा काढला की शुध्द प्रयोग प्रतीक्षेत हाच आहे,प्रतिक्षेत हा नव्हे.
जाणकारांचे यावरील विचार काय आहेत?
आपला कुतुहलग्रस्त,
मिलिंद