या लेखात तू घेतलेला वातावरणाबद्दलचा ऐतिहासिक आढावा आवडला. आपल्या पूर्वजांना ज्ञान काळाच्या मानाने खूपच पुढे होते. परंतु इस्लामी आक्रमणामुळे नंतर संशोधनाची परंपरा खंडित झाली, ती एकदम इंग्रजी राज्यातच सुरू झाली.
-विनायकराव
===
आपण तर बुवा नतमस्तक झालो आहोत. मीराताई ( गणित ), राधा ( कटपयादी सूत्रे ), मृदुला ( डॉर्विन चा सिद्धांत ) या सगळ्यांसमोर अगदी नतमस्तक. तूम्ही सर्व नौकरी, शिक्षण, घरकाम आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळून हे कसे पार पाडता हे एक नवलच म्हणावे लागेल. 
असेच लेख वाचण्यासाठी मिळावे हीच प्रार्थना.
-
द्वारकानाथ
===
आपला लेख रोचक आहे. आपल्या अभ्यासकतेला अभिवादन.
-प्रवासीपंत
===
आपले पूर्वज मूर्ख होते असा बरेचदा आधुनिक युरोपीयांचा दृष्टिकोन आढळतो. याउलट भारतीय लोक नेहमीच आपल्या पूर्वजांच्या अभ्यासाचा व ज्ञानाचा आदर करत आले आहेत.
-प्रवासीपंत
===
आगामी लेखांमध्ये येणारी विधाने ही अंतिम सत्य नसून अमुक अमुक लोकांची मते आहेत असा वैधानिक इशारा वेळोवेळी देणे आवश्यक आहे असे वाटते.
-प्रवासीपंत

१००% सहमत.
===

प्राचीन काळातील पंडितांनी मिळवलेल्या ज्ञानाचा अभ्यास करून आणि त्यात भर घालून मानवी पिढ्या आपले निसर्गाबद्दलचे कुतूहल अधिक ज्ञान मिळवून शमविण्याच्या प्रयत्नात आहेत. - वरदाताई

हे वाक्य पटले आणि खूप आवडले. -प्रवासीपंत

युरोपीयांनी त्यांच्या अवगत ज्ञानात (पूर्वजांच्या आणि समकालीन) ज्ञानात भर घालून औद्योगिक क्रांती घडवून आणली हे सत्य आहे.

ग्रह ताऱ्यांच्या स्थलकालाची गणिते अचूक सोडवण्याचे ज्ञान होते हे सत्य आहे.

पण सामान्य माणसाला उपयोगी असे "घड्याळ" या संकल्पनेचे, यंत्राचे आणि त्याच्या निर्मितीचे ज्ञान भारतीयांना अवगत होते काय?

लंबक आणि त्याच्या स्थलकालाची समीकरणे कोणत्या प्राचीन भारतीय ग्रंथात आहेत का?

गीअर/कप्पी आणि त्यांच्या रचनेची समीकरणे कोणत्या प्राचीन भारतीय ग्रंथात आहेत का?

गेल्या
क) पाचशे-ते-हजार वर्षात
आणि/अथवा
ख) एक/दोन सहस्त्रकात
भारतीयांनी प्राचीन शास्त्रीय आणि वैज्ञानिक ज्ञानात (गणितात बरीच भर घातली हे माहित आहे.) काय भर घातली यावर कोणी लेखमाला करेल काय? का हा (क अथवा ख) कालखंड भारताचे अंधारयुग होता?

माझे या बाबतीत घोर अज्ञान आहे. कोणी हा अंधार दूर करेल का?