सर्वसामान्य निरीक्षणातून असे दिसून येते की शब्द उच्चारताना पोट आत जाते. (पोटाचे स्नायू आकुंचित पावून उदरपटलाद्वारे** फुफ्फुसांवर दाब आणतात, त्या दबावामुळे हवा बाहेर फेकली जाते, तीच हवा स्वरयंत्रातून पाठवून आपण बोलत असतो.)*
खूप जोरात ओरडताना पोटाला चांगलाच खळगा पडतो. (कारण वर लिहिलेली बोलण्याची क्रिया मोठा आवाज निर्माण करण्यासाठी फार कमी वेळात आणि फार तीव्रतेने केली जाते.)* त्या खळग्याचे केंद्र जणू बेंबीभोवती आहे असे बघणाऱ्याला वाटते. त्यावरून हा वाक्प्रचार आला असावा असे वाटते.
शरीरशास्त्राचे अभ्यासकच बेंबी(चा देठ...?) आणि उदरपटलामधले 'नाते' सांगू शकतील.
*ही माहिती शास्त्रीयदृष्ट्या तंतोतंत बरोबर नसू शकते.
**उदरपटल = पचनसंस्था आणि फुफ्फुसांना वेगळे करणारा पडदा.