भोमेकाका,

तुमचा वरील उद्योग पाहून माझ्यातील गणिताची विद्यार्थिनी सुखावली! फक्त २२/७ = लिहिताना टंकलेखनाची किंवा कॉपी/पेस्ट मध्ये चूक झाली असावी.  ती तेवढी दुरुस्त करा म्हणजे एकदम सगळं छान!

लेखमालेवरील चर्चा लेखमालेस निश्चितच अधिक रंजक करतील.
-----------
सुबोध दामले यांनी सांगितलेले समीपन २२/७ पेक्षा जास्त अचूकतेकडे झुकतेच. त्यांना ते अभियांत्रिकीच्या अभ्यासात केव्हा तरी सापडले. त्यांनी स्वत: एक समीपन काढले होते त्यात अंश आणि छेद सात/आठ आकडी होते. मी त्यांना तेही पाठवा असे सांगितले आहे पण ते म्हणाले त्याला खूप दिवस झाले, आता आठवत नाही! (असो. हे पुढचे सर्व आमच्या 'व्यनि'व्यवहारातून झाले.)त्यांना ते कधी आठवलं तर मजा येईल.