आपल्या लेखनात येणारे भाव आणि तपशील हे खरेखरे असतात. त्यामुळे ते वाचकांस विशेषतः तरुण पिढीस भिडतात (अपील होतात) असे वाटते.

माझे स्वतःचे आणि इतर लोकांचे मी पाहिलेले अनुभव जास्त फेरफार न करता लिहिलेत. ते अपीलिंग (इंग्रजी) होत असतीलही पण अपील केल्यावर पंचांनी (वाचकांनी) ती उचलून धरली तर बरे.

विनोद निर्माण करण्यात आपला हातखंडा आहे.

वाहवा! मी धन्य झालो हे वाचून (पण हे वाक्य पाहून काही समाजकंटकांचे असे निरोप आले "प्रवासींनाही "सुजाता पॅलेस" मध्ये मेजवानी दिली की काय?", "तुझ्या लांबलचक लेखापेक्षा, प्रवासींचा हा एका वाक्यातला 'विनोद' आवडला" आता तुम्हीच सांगा काय करावे)

आपल्याकडून छान छान लेखन होत राहो ही शुभेच्छा.

अनेक धन्यवाद!

क्षमा असावी, प्रतिसाद देण्यास उशीर झाला.

अहो याची काय आवश्यकता आहे? प्रतिसाद लवकरच दिला पाहिजे अशी काही अट नाही. आणि आपला अधिकार केवळ कर्मावर, फळावर नाही.