आपले निरीक्षण आवडले आपण केलेली इंग्रजीकृत नावेही! :)
हा शब्दप्रयोग मनोगतावर दोन वेळा (माझ्या माहिती प्रमाणे) केला गेला आहे. पूर्वीही गफलतीने हा विषय शास्त्रीय चर्चेत ओढला जाऊन मायक्रो ला अतिसूक्ष्म म्हणावे का असा संभ्रम निर्माण झाला होता (जो कालांतराने दूर झाला).
हा शब्द प्रयोग कधीही शास्त्रीय दृष्टिकोनातून केला गेला नव्हता (पाहा शास्त्रीय मराठी चर्चा वा मराठी प्रतिशब्द द्या). याचा असा वापर विनोदाचा वा उपरोधाचाच विषय होता ('पाय' च्या बाबतीत दहा लाखा दशांशापर्यंत काढलेल्या किंमतींची व्यवहार्यता व 'मायक्रोसॉफ्ट ऑफिस' ने वापरलेली १५ दशांश स्थळा पर्यंतची मर्यादा हा विषय होता. शिवाय त्या लेखाच्या नावातही ('पाय चाललयं पाय?) फारसे गांभिर्य नव्हते. ).
मायक्रोसॉफ्ट हा शब्दच मुळात तसा निरर्थक आहे आणि हा नुसत्या विशेषनामाचा प्रश्न नसून ट्रेड मार्क (आता याला प्रतिशब्द हवा) चा ही आहे बरं.
थोडक्यात मी आपणांशी सहमत आहे.