तो,
पण आपला 'तो' प्रतिसाद विनोद बुद्धीने लिहिला होतात हे शीर्षक वाचताच लक्षात आले होते. आपल्या 'त्या' प्रतिसादावरूनच मला वरील प्रतिसाद लिहायचे सुचले. आणि म्हणूनच मी खालील वाक्य लिहिले होते/आहे...
गमतीसाठी असे शब्दप्रयोग करणे आणि गंभीर चर्चेत अथवा लेखात आपले विचार प्रकट करताना असे शब्द वापरणे यात खूप फरक आहे असे वाटते. अश्या शब्दांचा विचारपूर्वक वापर व्हावा.
माझा वरील प्रतिसाद योग्य अर्थाने घेतल्याबद्दल धन्यवाद.
===
ट्रेडमार्क ला व्यापारचिन्ह हा शब्द वाचल्याचे आठवते, पण ते सकाळमध्ये होते का मनोगतावर हे आठवत नाही.