परभारतीय,
राकट,कणखर मराठी भाषा इत्यादी ठीक आहे पण कित्येकांना असं सरळ एकेरीवर आलेले आवडत नाही.इंग्रजी(हा ही एक जी) भाषेत नावापुढे Mr. लावले की झाले.मराठीत मात्र जी, राव, पंत या पर्यायांपैकी एक निवडावा लागतो.अमेरीकेतील रुढी जशाच्या तशा मराठीत आयात नाही करता येत या वृकोदराच्या म्हणण्याशी मी सहमत आहे. भाषेच्या कृत्रिमपणाबद्दल म्हाणाल तर बोलण्याची भाषा आणि लिखित भाषा ह्यात हा फरक असतोच. ज्यांना आपल्या नावास उपाधी लावलेली आवडत नसेल त्यांनी तसे स्पष्ट केले की झालं.

आपला,
मिलिंद