देवदत्तराव, मोझिला फायरफॉक्स मध्ये (आणि आणखीही काही मुक्तस्रोत
ब्राउजर्समध्ये) टॅब्ड
ब्राउजिंग खूप दिवसापासून आहे. पण एकदा लिखाणाच्या
भागात (टेक्स्ट बॉक्स) टिचकी मारली की ctrl+t ने नवीन टॅब उघडत नाही.
(जसे "हे" टाईप करताना फायरफॉक्समध्ये मी ctrl+t दाबले तर नवीन टॅब उघडत
नाही) जे एकदम लॉजिकल आहे. IE मध्ये असे आहे की नाही माहित नाही.
मायक्रोसॉफ्ट ची परंपरा पाहता अशा इल्लॉजिकल गोष्टींची
शक्यता नाकारता येत नाही (मासॉ प्रेमी, कृपया हलकेच घ्या)