रडलो आम्ही इष्कात जेव्हा आम्हा रडावे वाटले.
तेव्हा नव्हे, इष्कास जेव्हा आम्ही रडावे वाटले.
आसुवरी अधिकार हाही इष्कात ज्याला साधला,
नुसताच नाही इष्क, त्याला मोक्ष आहे साधला.