एल निन्यो आणि ला निन्या साठी मराठी नावे वापरावीत का? असा खरेच प्रश्न आहे. ह्या दोन्ही शब्दांना अर्थ असले तरी ती आता त्या हवामानीय घटनांची विशेषनामे झाली आहेत. एल निन्योची सुरुवात डिसेंबर च्या सुमारास होत असल्याने त्याला एल निन्यो म्हणजे 'छोटा मुलगा' वा 'बालयेशू' असे नाव दिले गेले. ला निन्याचा अर्थ 'छोटी मुलगी' असा आहे. त्यामुळे भोमेकाकांनी सुचवलेली छकुला आणि छकुली ही नावे चपखल ठरतील. पण मुळात मराठी नावे वापरण्याविषयीच मी साशंक आहे.  मात्र ह्यावर थोडी अधिक चर्चा झाल्यास पुढच्या लेखांत कसा उल्लेख करावा ह्याबद्दल मला ठरवता येईल.