रोहीणीताई,
नाडी म्हणजे आपण लेंग्यात आणि सलवारीत घालतो ती नाडीच पाहिजे कि पांढरा जाड दोरापण चालेल? आणि पाकळीच्या दोन्ही बाजूने भोके पाड्णे कळले. नंतर पाकळीच्या २ टोकांना जोडणारा नाडीचा टाका. पण मग 'सर्व पाकळ्या नाडीने भराव्यात' मधे प्रत्येक पाकळीमधे पाकळीभर उभे समांतर नाडीटाके कि प्रत्येक पाकळीत फक्त एकच नाडीटाका?सर्व पाकळ्याना जोडणाऱ्या रेषा म्हणजे काय? जरा डोळ्यासमोर येत नाहीये. पण या प्रकाराची चित्रे मिळवून ती इथे टाकणे ही अवघड गोष्ट आहे हे ही खरे.
(प्रश्नांकीत)अनु