अमित...
आपण चांगली माहिती दिलीत. धन्यवाद.

आजच म.टा. मध्ये ह्याबाबत एक बातमी वाचली. ती इथे लिहित आहे.

********
व्हिटॅमिनच्या गोळ्या घेण्याची आवश्यकता नाही!

[ Wednesday, August 10, 2005 08:23:27 pm]
 
लंडन (वृत्तसंस्था) : 'वय झालं की व्हिटॅमिन, कॅलशिअमच्या गोळ्या घेऊनच दिवस काढावे लागतात', या वयोवृद्धांच्या विचाराला स्कॉटलंडमधील अबॅरडीन युनिव्हसिर्टीने छेद दिला आहे. व्हिटॅमिनच्या गोळ्या घेतल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढत नसल्याचा दावा या युनिव्हसिर्टीतील शास्त्रज्ञांनी केला आहे. या शास्त्रज्ञांचे मत व्हिटॅमिनच्या गोळ्यांच्याविरोधात आहे.

' ब्रिटिश मेडिकल जरनल'मध्ये हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. 65 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या 900 जणांचा या सवेर्क्षणात समावेश करण्यात आला होता. यातील दहा टक्के लोकांमध्ये व्हिटॅमिन आणि मिनरलची कमतरता होती. त्यामुळे त्यांना रोगजंतूंचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे.

ब्रिटनमधील वयोवृद्धांमधील सुमारे एक चतुर्थांश लोक शरीराला पोषक ठरणाऱ्या औषधांचा वापर करतात. मात्र त्यांच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढल्याची कोणतेही लक्षणे दिसून येत नाहीत, असे या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

सवेर्क्षणात समावेश असलेल्यांची जीवनपद्धती, त्यांना होणारा संसर्ग, त्याचा कालावधी, औषधांचे प्रकार, त्यांची वैद्यकीय सुविधा अशा विविध मुद्द्यांचा यात विचार केला गेला. मात्र, पोषक व्हिटॅमिन्ससाठी पोषक औषधे घेतल्याने स्वास्थ्यात आणि रोगप्रतिकारशक्तीत फारसा फरक पडत नसल्याचेच या सवेर्क्षणाअंती आढळून आले.