अनु,

आपण जी सलवारीत घालतो तीच नाडी पाहिजे. नाडीमधे दोन प्रकार असतात. एक गोल आणि एक सपाट. त्यातील सपाट नाडी वापरणे. पांढरा जाड दोरा नको. सपाट नाडीमुळे पाकळीचा आकार येतो. प्रत्येक पाकळीत फक्त एकच नाडीटाका. सर्व पाकळ्यांना जोडणाऱ्या रेषा म्हणजे पाकळ्यांनी मिळून एक फूल बनते, अशी अनेक फुले आणि रेषा म्हणजे त्यांची देठे.

पुण्यात तुळशीबागेमधे नाडीवर्कच्या पडद्यासाठी छाप छापुन मिळतात, आता मिळतात का नाही ते माहित नाही. विचारुन बघ. हा पडदा इतका छान दिसतो की खऱ्या पाकळ्या चिकटवल्या आहेत की काय असे वाटते. जाईच्या फुलाच्या पांढऱ्या शुभ्र पाकळ्या कशा दिसतात तश्याच ह्यापण दिसतात. पडदा धुतल्यावर नाडीवर्क चुरगळले जाउ नये म्हणुन त्या पाकळ्यांच्या आतून चार बाजुंनी एकेक अशा चार पांढऱ्या बारीक दोऱ्याच्या खूप छोट्या टीपा घालणे.

धन्यवाद.