कवी नीलहंस, आपला उपक्रम वाखाणण्याजोगा आहे.
प्रवासी व नीलहंस, दोघांचीही समस्यापूर्ती अप्रतिम आहे! त्याच धर्तीवर ही जरा आधुनिक समस्यापूर्ती
तुझीच आहे सदा सख्या मी, अताअताशाच रात्र आली
तुला मिळाया नवा बहाणा, पहा पुन्हा ही पहाट झाली
आता तुमच्या माझ्या समस्यापूर्तीचे घड्याळ पुढे सरकवू किंवा तिला वास्तवात आणू!
लवकर का आज रात्र आली? थकून गेले करून कामे
तरी लगोलग कुणी म्हणाले, करा चहा ही पहाट झाली