'ताजे लेखन' सदरात 'माझे अलीकडील लेखन' असा पर्याय आहे. त्याच प्रमाणे दुसऱ्या एखाद्या मनोगतीचे आज पर्यंतचे लेखन नजरेखालून घालायचे असेल तर तसा पर्याय उपलब्ध नाही. कधी कधी प्रतिसाद देण्यासाठी, वाद-विवादासाठी त्याची अत्यंत गरज असते. तेंव्हा, एखाद्या मनोगतीचे नांव देऊन त्याचे आज पर्यंतचे सर्व लेखन (प्रतिसादांसकट) एका दृष्टिक्षेपात आणता आले तर सर्वांनाच ते सहाय्यभूत होईल.

धन्यवाद.