'आता मनाचा दगड घेतो कण्हत उशाला' यात खरच काही आक्षेपार्ह वाटत नाही.

आपली वर्णण्या लीला महाकवीच पाहिजे झाला
मजसारख्या घुंगुरड्याला ते साधणे कठीण.

- संत दासगणू महाराज

जैसा स्वभावो मायबापांचा । अपत्य बोले जरी बोबडी वाचा
तरी अधिकचि तयाचा । संतोष आथी ॥ ६४॥
तैसा तुम्हीं मी अंगीकारिलां । सज्जनीं आपुला म्हणितला ।
तरी सहज उणें उपसाहला । प्रार्थूं कायी ॥ ६५॥

ऐसें जें अगाध । जेथ वेडावती वेद ।
तेथ अल्प मी मतिमंद । काय होय ॥ ७३॥

- संत ज्ञानेश्वर

आमची मुख्य भीती ही की अश्या काव्यापासून प्रेरणा घेत लोक लिहीत राहिले तर कवितेचा शाब्दिक स्तर खाली खाली घसरत जाईल आणि शिवीगाळ हेच काव्य होऊन बसेल का काय?

चू भू द्या घ्या

आपला
(सत्यशिवसुंदर) प्रवासी