अहो हे सगळे ज्यागोष्टीच्या बाबतीत आपण वापरतो ना त्या गोष्टीच्या लिंगावर अवलंबून आहे..
उदा. मी ही गोष्ट केली < स्त्री >   
      मी ह्या गोष्टी केल्या  < स्त्री अनेकवचन >
                 गोष्ट ऐवजी जर एखादे स्त्रीलिंगी कर्म असले तर ते त्याच्या स्वतःच्या अनेकवचनानुसार बदलते.. पण क्रियापद मात्र.. ली ऐवजी ल्या असेच बदलले जाते...

आता उरला बाकीच्या केल्यांचा ः) अर्थ..
   मी असे केल्यास असे होईल वगैरे वगैरे ... 
  यासाठी अजून चांगली वाक्यरचना म्हणजे.
           " मी असे करता.. असे होईल... " असे मला वाटते...
           " मी असे केल्यावर .. असे होण्याची शक्यता आहे.."

मी पोळ्या केल्याकेल्या खाल्ल्या... यामध्ये २ प्रश्न आहेत...
   केल्या १  आणि २ खाल्ल्या...
आता केल्या केल्या यासाठी पर्यायी शब्द म्हणजे...
      " मी पोळ्या केल्यावर लगेचच खाल्ल्या.. " असे मला वाटते..आता यातील खाल्ल्या हे पोळ्यांसाठीच्या स्त्रीलिंगी अनेक्वचनानुसार बदलले आहे  त्यात आता वाद वाटत नाही आणि नसावाही....

   चु भू द्या घ्या... कसे वाटते तेही कळवावे...
              मन