मन,
तुम्ही दिलेली 'ल्या'युक्त वाक्ये आणि माझ्या प्रश्नामधे अपेक्षित वाक्यांमधे फरक आहे. 'पोळी/पोळ्या केल्या केल्या खाल्ली/खाल्ल्या' मधला वा 'काही केल्या झाले नाही' मधला 'केल्या' आणि 'आजकाल असे केल्या जाते' मधला 'केल्या' मधे फरक आहे. कारण तिसरे वाक्य 'आजकाल असे केले जाते' असेही लिहिले जाते.
माझा ले व ल्या हा प्रश्न past perfect काळामधे लिहिलेल्या वाक्यांसाठी आहे. तुम्ही प्रतिसादामधे दिलेली उदाहरणे त्यात बसत नाहीत.
-वरदा