ले व ल्या संदर्भात मी काही जणांशी चर्चा केल्यावर असे लक्षात आले आहे की अशी 'ल्या'युक्त वाक्यरचना करणारी बहुतेक मंडळी ही वऱ्हाड, नागपूर, अमरावती व आसपासच्या भागात रहाणारी वा बालपणी त्या भागात राहिलेली, शालेय शिक्षण त्या भागांत झालेली अशी आहेत. त्यामुळे तो तेथील भाषासंस्कृतीचा भाग असावा असे वाटते. 

वरील उल्लेखातील भागांमधे राहणाऱ्या/राहिलेल्या मंडळींनी यावर अधिक लिहिल्यास बरे होईल.