अशी 'ल्या' वाल्या वाक्यांची उदाहरणे चित्तरंजन, राजेंद्र प्रधान व सुवर्णमयी यांच्या लेखनात तुम्हाला सापडतील. उदाहरणादाखल वरील प्रतिसादांपैकी मी लिहिलेला 'उदाहरण' नावाचा चौथा मुख्य प्रतिसाद पहा, ज्यात राजेंद्र प्रधानांच्या लिखाणातील उदाहरणे आहे.
हे सुवर्णमयी यांच्या 'नागपंचमीच्या शुभेच्छा' ह्या श्रावणी यांच्या लेखनाला दिलेल्या 'नागपंचमी' नावाच्या प्रतिसादातील वाक्यः
त्यांचीच जर हत्या झाली तर पुढे त्यांच्या संख्येवर अनिष्ट परिणाम होईल. शेतकऱ्यांना त्यांची असलेली उपयुक्तता तर कमी होईलच आणि निसर्गाचा जो समतोल आपोआप राखल्या जातो त्यात सुद्धा ढवळाढवळ होईल. म्हणून लोकहो निदान ह्या दिवशी तरी मुद्दाम सापला मारु नका. - सुवर्णमयी
'आर्य होते की आले' ह्या चर्चेवरील चित्त यांच्या 'आर्य' ह्या प्रतिक्रियेतील हे वाक्य बघाः
वैदिक काळातल्या आर्यांच्या संस्कृतीशी ऑकर कलर्ड पॉटरीला जोडल्या जाते. उत्खननात असे फारच तुरळक अवशेष आहेत. आर्य भारतातलेच असते तर असे अवशेष जागोजागी सापडले असते. -चित्त
नोंदः वरील विधाने केवळ उदाहरणादाखल, व कुणी 'ल्या'युक्त वाक्यरचना केलेलीपाहिली नसेल तर तशी ती केली जाते हे सिद्ध करण्यासाठी दिलेली आहेत. लेखकांचा कोणत्याही प्रकारे अवमान करण्याचा प्रयत्न नाही वा त्यांच्या बद्दल वैयक्तिक आकसही नाही.