बर्लिन प्रवासवर्णनावर आपण सर्वांनी दिलेल्या प्रतिसादांबद्दल आभार.
या प्रवासात एक गोष्ट जाणवली की जर्मन माणूस नावाचा असा एक वेगळा प्राणी अस्तित्त्वात नाही. मला भेटलेल्या प्रत्येक जर्मन माणसाचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व होते. बऱ्याच वेळा असेही जाणवले की सर्वसामान्य जर्मन नागरिक वरवर कितीही धिप्पाड दिसत असला तरी प्रत्यक्षातमात्र तो बराच साधा भोळा असतो.
बर्लिन शहराविषयीच सांगायचे तर बर्लिनमध्ये बऱ्याच वेळा मुंबईची आठवण झाली. झूलॉगिश गार्डन जवळचा भाग तर अगदी मुंबईच्या फोर्ट भागातील विक्रेत्यांची आठवण करून देणारा होता. मध्यबर्लिनमधील रस्ते आणि इमारतीही दक्षिण मुंबईची आठवण करून देणाऱ्याच. बाकी पूर्व आणि पश्चिम बर्लिनमध्ये असलेला फरक मात्र दिवसेंदिवस कमी होत आहे.
बाकी बऱ्याच वर्षांनी मराठीमध्ये काहीतरी लिहीत असल्यामुळे झालेल्या प्रवासवर्णनाच्या रटाळपणा अथवा चुकांबद्दल क्षमस्व.
- परेश