प्रमाणित भाषा म्हणजे पुण्या/मुंबई/नाशिकची भाषा असे माझे म्हणणे नाही.
 
हायसे वाटले. तसे आपले म्हणणे नसावेच. सूर्य वऱ्हाडातही उगवतो.
 
दोन प्रकारांनी एकच वाक्य लिहिले (लिहिल्या) जाते, व ते दुसऱ्या प्रकाराने लिहिणे ही वऱ्हाड व आसपासच्या प्रदेशाची भाषासंस्कृती असावी एवढेच माझे म्हणणे आहे.
 
म्हणण्यापर्यंत ठीक आहे. प्रत्येक प्रांताच्या भाषासंस्कृतीत वेगळेपणा असतोच. तो वेगळेपणा जपायलाच हवा.