देवाला बोल लावणे असा एक अंधश्रद्धेचा प्रकार आहे, त्यात देवाच्या मूर्तीच्या डोक्यावर फूल ठेवून बोल लावतात की "देवा, काम होणार असेल तर फूल एका बाजूला पाड एरवी दुसऱ्या बाजूला पाड." (ह्यालाच कौल लावणे असेही म्हणतात.) ह्यावरून 'बोल' काय होता आणि 'फूल' कुठे पडले ह्यातील योगायोग दाखवण्यासाठी बोला फुलाला गाठ असे म्हणू लागले असावेत.
हा सगळा माझा कल्पनाविलास आहे, त्याला कुठल्याही शास्त्रीय ग्रंथाची पुष्टी नाही. चू. भू. द्या. घ्या.