हा लेख वाचताना माझ्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला. संताप, स्फूर्ती, आणि सद्गदितपणामुळे डोळ्यांत पाणी आले. या साऱ्या माऊल्या आपल्या सर्वस्वाचे बलिदान करताना क्रांतीच्या अग्निकुंडात आहुती म्हणून पडल्या.त्यांच्या बलिदानाबद्दल पाठ्यपुस्तकांमधला मजकूर सगळा मिळून एक परिच्छेदही भरणार नाही. वात्सल्यमूर्ती जगदंबेचं हे रणरागिणीचं रूप आज विस्मरणात गेलं आहे. या स्त्रियांच्या अफाट धैर्याला आणि त्यागाला खरोखर तोड नाही. जेव्हा देशभरातले शेकडो भेकड लोक आपापल्या नोकऱ्या आणि वतनं वाचवायला इंग्रजांचे लांगूलचालन करत होते त्या वेळी या वीरांगना त्यांच्यासमोर हिमालयापेक्षाही मोठा आदर्श ठेवत होत्या. पण त्या आदर्शाची किंमत आमच्या या कमनशिबी देशाने कधीच केली नाही. आज धडाडीच्या आणि तडफदार मुलींना "मोठी झाशीची राणीच लागून गेलीस की नाही तू " असं म्हणून त्यांना हिणवण्याशिवाय झाशीच्या राणीची देखिल आठवण कोणाला येत नाही. आजवर या आणि अशा अनेक अनाम मुलींनी आपल्या घरादाराची होळी करून मातृभूमीचे पांग फेडले आहेत. या स्त्रियांना पाठ्यपुस्तकात आणि पर्यायाने आम्हा नवीन पिढीच्या भावविश्वात स्थान कधी मिळणार? त्यांच्या परक्रमाच्या कहाण्या सांगणारं एखादं पुस्तक आहे का कुठे? त्यांना माझे प्रणाम....