श्री. चित्त यांचे म्हणणे योग्य वाटते. बालसाहित्यिकांसाठीच विभाग तर असावाच पण बालसाहित्य लिहिणाऱ्यांसाठीही सोय असावी. म्हणजे लहान मुलांनाही या संकेतस्थळाचा लाभ घेता येईल. " हल्ली संगणकाच्या युगात मुले अजिबात मराठी वाचत नाहीत " ही समस्या कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हे एक छोटेसे पाऊल ठरू शकेल.