वरदाताई,
एकसंध प्रमाणित भाषेत किंवा प्रमाण भाषेत, आपण वाटल्यास मराठी पाठ्यपुस्तकातली भाषा म्हणू, राखल्या जाते कधीच दिसणार नाही.
पण, नागपुरातील मराठी दैनिकातल्या मराठीला या राखल्या जातेचे वावडे नाही.
एका अर्थाने, राखल्या जाते ही नागपूरच्या प्रमाणभाषेची खासियत आहे. अशाच
खासियतीचे आणखी एक उदाहरण, रजिस्ट्रेशनला पुण्यात नोंदणीकरण म्हणतात तर
नागपुरात
पंजीकरण. असो.
आपण ल्यांना हुडकून हुडकून काढले. आभारी आहे.
चित्तरंजन
एक खोडसाळ अवांतर - आपण एवढीच मेहनत, रुची, उत्साह माझ्या कवितेला
प्रतिसाद देताना का न दाखवावा याचा विचार करतो आहे. आपण इतर गझलांना,
कवितांना दिलेले प्रतिसाद बघून माझ्या गझला या तुलनेत सुमार आणि दुय्यम
असाव्यात अशी माझी भावना होते आहे. (आणि मधेच तुम्ही वऱ्हाडातल्या
प्रतिभेवर जळत असावात, तिचा द्वेष करत असावात असा हास्यास्पद विचारही येतो
आहे.) असो.