नमस्कार.

सुभाषराव, तो सावधसाठी सतर्क हा हिंदीच्या प्रभावामुळे आलेला शब्द आहे. तसाच प्रेक्षकसाठी 'दर्शक' हा शब्द येतो. गैरसोयीऐवजी 'असुविधा' येतो. पंतप्रधानच्याऐवजी 'प्रधानमंत्री' येतो. (मूळ मराठीत प्रधान आणि मंत्री या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच. म्हणूनच 'अष्टप्रधान मंडळ'!) अभिमान या शब्दासाठी 'गर्व' हा शब्द येतो. (उदा. हिंदुत्ववादी विचारधारेच्या काही लोकांनी 'गर्व से कहो हम हिदु हैं' अशी घोषणा काढली. संस्कृतमध्ये व हिंदीमध्ये गर्व या शब्दाचा अर्थ हा मराठीतील अभिमान शब्दासारखा आहे, म्हणजेच गर्व हा उचित असतो, आणि त्याउलट अभिमान या शब्दाचा अर्थ मराठीतील गर्व शब्दासारखा आहे, म्हणजेच अभिमान हा त्याज्य असतो. परंतु उत्साही मराठ्यांनी मात्र त्या घोषणेचे भाषांतर केले 'गर्वाने सांगा की मी हिंदू आहे' असे केले.)

तसेच मग राव, साहेब, पंत असे मराठी आदरदर्शक प्रत्यय न लावता 'जी' हा हिंदीतील प्रत्यय लावायची पद्धत सुरू झाली आहे. (मूळ मराठीत तो विशेषनामांचा भाग म्हणूनच येतो, निराळा प्रत्यय म्हणून नव्हे.)

आपला,

मराठा