नमस्कार.

अंतः हा उपसर्ग इंग्रजीतील 'intra'शी समानार्थी आहे, आंतर हा उपसर्ग इंग्रजीतील 'inter'शी समानार्थी आहे. अंतः हा उपसर्ग व्यंजनाने सुरू होणाऱ्या अन्य शब्दाच्याआधी ज़ोडताना (सामान्यपणे - अपवादांसाठी संधींचे नियम पाहावेत) विसर्गाचा र् (बोलीभाषेत - पायमोडका र!) होतो, आणि तो अर्धा र म्हणून पुढील व्यंजनाच्या आधी ज़ोडला ज़ातो. आंतर उपसर्गातील र हे मात्र पूर्णाक्षर आहे, त्यामुळे तो उपसर्ग नुसताच तसाच ज़ोडला ज़ातो.

त्यामुळे महेशनी लिहिले आहे त्यात थोडी दुरुस्ती करून,

अंतर्देशीय/अंतर्राष्ट्रीय = देशामधील, देशांतर्गत = इंट्रानॅशनल/डोमेस्टिक

आंतरदेशीय/आंतरराष्ट्रीय = दोन देशांमधील = इंटरनॅशनल

तसेच आंतरज़ातीय (इंटरकास्ट), आंतरमहाविद्यालयीन (इंटरकॉलेज) परंतु अंतरंग (= अंतः + अंग = within body), अंतर्ज्ञान (= अंतः + ज्ञान = आतून झालेले ज्ञान = knowledge from within) इ.

त्यामुळे भारत-पाकिस्तान, इंग्लंड-ऑस्ट्रेलिया हे आंतरदेशीय सामने आहेत, तर रणजी करंडक हे आंतरराज्य व अंतर्देशीय सामने आहेत. तसेच इंग्लंडातील कौंटी सामने हे अंतर्देशीय/अंतर्राष्ट्रीय सामने आहेत.

आपला,

मराठा